महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर  ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे

रत्नागिरी – महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस हे देशात अग्रेसर आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला जिल्हा विकास निधीतून १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकली आणि ४ बसेसच्या लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘‘या वाहनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी न्यून होण्यास निश्चितपणाने साहाय्य होईल. पोलिसांच्या घर निर्मितीला त्याचसमवेत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांना पोलिसांची भीती वाटता कामा नये, तर चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत रहावे.’’