गेल्या एका मासात ११ लाख ३२ सहस्र भारतियांची ट्विटर खाती बंद !

आतंकवादाला प्रोत्साहन देणारे ट्वीट्स केल्याने कारवाई

नवी देहली – ट्विटरने गेल्या एका मासामध्ये ११ लाख ३२ सहस्र भारतीय वापरकर्त्यांची खाती बंदी केली. या खात्यांवरून आतंकवादाला प्रोत्साहन देणारे ट्वीट्स केले जात होते, असे आस्थापनाने म्हटले आहे. टि्वटरचे मालक इलॉन मस्क यांनी ‘ वापरकर्त्यांनी कोणताही मजकूर, छायाचित्र किंवा व्हिडिओ प्रसारित करतांना चुका होणार नाहीत, याची काळजी घ्यावी’, असे आवाहन केले आहे.

गैरवर्तनामुळे २६३ खाती, तर घृणास्पद वर्तनासाठी ८४ खाती बंद करण्यात आली आहेत. अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी ५१ खाती बंद करण्यात आली.