केंद्र सरकारकडून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर बंदी

केंद्र सरकारकडून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर बंदी

केंद्र सरकारने ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेची उपशाखा म्हणून कार्यरत असणार्‍या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या आतंकवादी संघटनेवर बंदी घातली. गृह मंत्रालयाने टी.आर्.एफ्.ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे. ही संघटना वर्ष २०१९ मध्ये अस्तित्वात आली होती.

देहली महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी अभूतपूर्व गदारोळ !

देहली महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी अभूतपूर्व गदारोळ !

आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी
नगरसेवकांवर ब्लेडद्वारे आक्रमण केल्याचा आरोप

‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्यांमध्ये पालट करण्याचा सेन्सॉर बोर्डाचा आदेश

‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्यांमध्ये पालट करण्याचा सेन्सॉर बोर्डाचा आदेश

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्ये पालटण्यास सांगितले आहे. तसेच काही संवादही पालटण्यास सांगितले आहे.

चित्रपट, मालिका आदींद्वारे होणारा धर्माचा अवमान रोखण्यासाठी ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना

चित्रपट, मालिका आदींद्वारे होणारा धर्माचा अवमान रोखण्यासाठी ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना

द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली स्थापना ! नवी देहली – चित्रपट, सामाजिक माध्यमे आणि दूरचित्रवाणी यांद्वारे होणारा हिंदूंच्या देवतांचा, धर्माचा अवमान रोखण्यासाठी आता ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना करण्यात आली आहे. द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी याची स्थापना केली आहे. हे बोर्ड चित्रपटांतील धार्मिक गोष्टींवर … Read more

एक्सप्रेस रेल्वेगाडीला ३ घंटे उशीर झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार !

एक्सप्रेस रेल्वेगाडीला ३ घंटे उशीर झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार !

एक्स्प्रेस रेल्वेगाडीने प्रवास करतांना गाडीला ३ घंटे उशीर होत असेल, तर तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार आहेत. एवढेच नाही, तर अल्पाहार आणि जेवण हेही विनामूल्य मिळणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी केली आहे.

नशेची शोकांतिका !

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

पाकिस्तानी हिंदूही आता त्यांच्या नातेवाइकांच्या अस्थी भारतातील पवित्र गंगेत विसर्जित करू शकणार !

पाकिस्तानी हिंदूही आता त्यांच्या नातेवाइकांच्या अस्थी भारतातील पवित्र गंगेत विसर्जित करू शकणार !

पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट केला आहे.

तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदनातून उघड !

तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदनातून उघड !

तरुणीच्या करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या नातेवाइकांनी ती शेवटी विवस्त्र सापडल्याने या संदर्भात संशय व्यक्त केला होता.

मंत्र्यांच्या विधानांसाठी सरकार नाही, तर स्वतः मंत्रीच उत्तरदायी ! – सर्वाेच्च न्यायालय

कोणत्याही मंत्र्याच्या विधानासाठी सरकारला उत्तरदायी धरता येत नाही. यासाठी मंत्रीच उत्तरदायी असतात. यासंबंधी राज्यघटनेतील अनुच्छेद १९(२) मध्ये पूर्वीपासूनच योग्य ती तरतूद अस्तित्वात आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींच्या भाषणस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यास नकार दिला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ सैन्याधिकार्‍यांना लाचखोरीसाठी अटक केल्याचे वृत्त बनावट आणि दिशाभूल करणारे ! – सैन्यदल

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ सैन्याधिकार्‍यांना लाचखोरीसाठी अटक केल्याचे वृत्त बनावट आणि दिशाभूल करणारे ! – सैन्यदल

अशी खोटी वृत्ते प्रसारित करून भारतीय सैन्याची प्रतिमा मलिन करणार्‍या वृत्तपत्रावर कारवाई करा !