केंद्र सरकारकडून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर बंदी

नवी देहली – केंद्र सरकारने ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेची उपशाखा म्हणून कार्यरत असणार्‍या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या आतंकवादी संघटनेवर बंदी घातली. गृह मंत्रालयाने टी.आर्.एफ्.ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे. ही संघटना वर्ष २०१९ मध्ये अस्तित्वात आली होती.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टी.आर्.एफ्. संघटनेत तरुणांची ऑनलाईन भरती करून त्यांना आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी केले जात होते. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, तसेच शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांच्या तस्करीतही टी.आर्.एफ्.चा हात होता. ही संघटना सामाजिक माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील लोकांना भारताच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत होती.