‘काही साधकांना एखाद्या नामजपाचा काही लक्ष ते काही कोटी जप करायला काही संत सांगतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा, ‘इतका जप ते मोजतात कसे ?’ मी प.पू. रघुवीर महाराजांना (प.पू. दास महाराजांना) हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘इतका जप करण्यासाठी १ सहस्र मण्यांची जपमाळ वापरतात. तो जप दिवसाला १० माळा केला, तर दिवसाला १०,००० होतो. त्यामुळे महिन्याला ३ लाख होतो आणि वर्षाला तो ३६ लक्ष ५० सहस्र होतो. अशा तर्हेने तो मोजता येतो.’’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले