सोलापूर येथे बजरंग दलाच्या गोरक्षकांकडून २०५ गोवंशियांना जीवनदान !

वेळापूर येथून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीनुसार सोलापूर येथील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी अकलूज विभाग पोलिसांच्या साहाय्याने बोरगाव रस्ता येथे धाड टाकली..

(म्हणे) ‘गोरक्षकांकडून मुसलमानांना मारहाण होते ! – भाकप

अनेक राज्यांत गोहत्या बंदी असतांनाही गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कधी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !

दौंड (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत ४ गोवंशियांना वाचवण्‍यात यश !

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या, वाहतूक केली जात आहे. गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?

काशेवाडी (पुणे) येथे २ देशी गोवंश वाचवण्‍यात गोरक्षकांना यश !

गोवंश हत्‍याबंदी कायद्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्‍याची आवश्‍यक स्‍पष्‍ट करणारी घटना !

कोंढवा (पुणे) येथे ४ देशी गायी-बैल यांची कत्तलीसाठी वाहतूक करणार्‍या वाहनचालकावर गुन्‍हा नोंद !

केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्‍या गोहत्‍या कधीच थांबणार नाहीत ! गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी सरकारने गोहत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशुवधगृहे बंद करावीत! 

गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?

कोंढवा (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत ६ गोवंशियांची सुटका !

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्‍यानेच सर्वत्र गोहत्‍या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !

महाड (रायगड) येथील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट !

जिल्ह्यात होणारी गोतस्करी आणि गोहत्या आटोक्यात आणण्यासाठी, त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, कसाई अन् गोतस्कर यांच्याकडून हिंदु गोरक्षक आणि कायदेशीर कारवाई करायला येणारे पोलीस प्रशासन यांच्यावर होणारी आक्रमणे, जीविताला निर्माण होणारा संभाव्य धोका, वाढती धार्मिक तेढ, वाढता जातीवाद आणि राजेवाडी (महाड) येथील हिंदू आणि पोलीस यांच्यावर करण्यात आलेले भ्याड आक्रमण या सर्वांच्या निषेधार्थ अन् या विषयांवर चर्चा करण्यासाठी गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली.

श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे पोलिसांवर गोतस्करांचे प्राणघातक आक्रमण !

उद्दाम धर्मांध ! गोरक्षकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांध गोतस्करांची आता पोलिसांवर आक्रमण करण्यापर्यंत मजल गेली आहे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे !

बायथाखोल, बोरी येथे लाखो रुपयांचे अनधिकृत गोमांस कह्यात !

गोमांसाविषयी गोरक्षकांना माहिती मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही ?