दौंड (पुणे) येथे कसायांकडून गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर प्राणघातक आक्रमण ! 

६ धर्मांधांसह १० ते १२ अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार प्रविष्ट !

प्रतीकात्मक छायाचित्र

दौंड (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड यांना सांगितली. भैसडे यांनी १ डिसेंबर या दिवशी गोमांस विक्री करणारे इद्रीस कुरेशी, अकलाफ कुरेशी यांचे दुकान दाखवले. त्याप्रमाणे सदर दुकानाची पहाणी केली असता तेथे कोणत्याही प्रकारचे गोमांस विक्री करण्यासाठी ठेवलेले आढळले नाही. पुढे जात असतांना पोलिसांची मोटार सायकल अडवून पोलीस अन् बातमीदार आकाश भैसडे यांना धक्काबुक्की करून मारहाण करत त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले.

इद्रिस कुरेशी, असिफ कुरेशी, आश्पाक कुरेशी, अकलाफ कुरेशी, लडडू कुरेशी, शाहरूख कुरेशी आणि इतर १० ते १२ अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांच्या बेसावध वृत्तीमुळे दौंड येथे पुणे जिल्ह्यातील सर्वांत अधिक गोहत्या होत आहेत, असे गोरक्षकांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

गोरक्षकांवर आक्रमण करणारे कसाई पोलिसांवरही आक्रमण करण्यास धजावत आहेत. यावरून त्यांचा उद्दामपणा लक्षात येतो. 

पोलीसच मार खात असतील, तर ते गोहत्या कशी रोखणार ?