युद्धासाठी सिद्ध आहोत का ?

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला ‘युद्धासाठी सिद्धता करा’, असा आदेश दिला आहे. ‘चीन महायुद्ध करण्याची सिद्धता करत आहे किंवा तो त्या सिद्धतेने दक्षिण चीन सागर, हिंदी महासागर येथे कुरापती काढत आहे’, हे आता जगाच्या लक्षात आले आहे.

पर्यावरणास आणि आरोग्यास अत्यंत हानीकारक चिनी उत्पादने !

‘चिनी उत्पादने अत्यंत खालच्या प्रतीची, अल्प टिकाऊ आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा रसायनांनी युक्त आहेत,

(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !

चीनने पॅनगाँग तलावाच्या भागामध्ये सैनिक आणि नौका यांची संख्या वाढवली

काही दिवसांपूर्वी लडाखच्या पॅनगाँग तलावाजवळ भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये झटापटी झाली होती. आता याच भागात चीनने गस्तीच्या नावाखाली सैनिक आणि नौका यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे येथील तणावामध्ये भर पडली आहे.

जर्मन आस्थापन चीनमधून बाहेर पडून भारतात येणार

लावा इंटरनॅशनल या आस्थापनानंतर आता जर्मनीचे आस्थापन वॉन वेल्सनेही चीनमधील व्यवसाय बंद करून तो भारतात चालू करण्याचा निर्णय घेतला. हे आस्थापन बुटांचे उत्पादन करते.

चीनमध्ये कोरोनामुळे ५० टक्के डॉक्टरांना नैराश्य, तर ७१ टक्के दुःखी

चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या ३९ रुग्णालयांतील १ सहस्र २५७ डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांची एक पहाणी करण्यात आली.

कोरोनामुळे झालेली परिस्थिती आता सुधारेल ! – नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट

कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आहे. आता परिस्थिती सुधारेल, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट ‘लॉस एंजिल्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

चीनच्या कोरोनाग्रस्त हुबेई प्रांतात हिंसाचार

गेल्या ३ मासांपासून येथे लागू केलेल्या दळणवळण बंदीमध्ये चीन सरकारने काही काळासाठी सूट दिल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढून तणाव निर्माण झाला आहे.

चीनमधील हुबेई येथील दळणवळण बंदी ८ एप्रिलला हटवणार

चीनच्या हुबेई प्रांतामध्ये कोरोनामुळे गेल्या ३ मासांपासून असलेली दळणवळण बंदी (लॉकडाऊन) ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे, असे चीनने घोषित केले आहे. हुबेईची राजधानी असलेल्या वुहानमध्ये दळणवळण बंदी उठवल्यावर ११ लाख लोकांना दिलासा मिळणार आहे.

चीनमध्ये भ्रमणभाष वापरणार्‍यांची संख्या अचानक २ कोटींनी घटली

चीनच्या वुहान शहरातून चालू झालेल्या कोरोनामुळे जगभरात ३ लाख ७९ सहस्र ८० जण बाधित झाले आहेत, तर १६ सहस्र ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ३ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र ही संख्या अल्प असल्याचे आता म्हटले जात आहे.