चीनमध्ये ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२’च्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

बीजिंग ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२

बीजिंग – चीनची राजधानी बीजिंगमध्ये होणार्‍या ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२’ला ३ दिवस शिल्लक असतांना कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली आहे. सध्या असलेली रुग्णसंख्या गेल्या १८ मासांतील सर्वोच्च आहे. ऑलिंपिकच्या ‘क्लोज्ड लूप बबल’ (कोरोना संसर्गापासून संरक्षित क्षेत्र) क्षेत्रात ३४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. यामध्ये १३ खेळाडू आणि विमानतळावरून येणार्‍या इतर अधिकार्‍यांचा समावेश आहे. ३० जानेवारी या दिवशी बीजिंगमध्ये कोरोनाचे २० रुग्ण मिळाले.

महामारी चालू झाल्यापासून चीनमधून येण्या-जाण्यावर निर्बंध असले, तरी ‘हिवाळी ऑलिंपिक’ होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. चीनमध्ये आल्यानंतर आणि चीनमधून जातांना लोकांना कोरोनाविषयक चाचणी करावी लागेल. जे लोक ‘बबल’मध्ये (कोरोना संसर्गापासून संरक्षित क्षेत्रात) आहेत, त्यांचीही प्रतिदिन चाचणी केली जाईल. चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यापासून चीनने ‘झिरो कोविड’ धोरण अवलंबले आहे. यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते.