नेपाळमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावरून चीनच्या विरोधात निदर्शने चालूच !

नेपाळची जनता चीनच्या षड्यंत्राच्या विरोधात आता जागृत होत आहे, हे चांगले लक्षण आहे. अशा जनतेला आता भारताने साहाय्य करणे आवश्यक आहे ! – संपादक

नेपाळमध्ये चीनच्या विरोधात निदर्शने

काठमांडू (नेपाळ) – चीनचा नेपाळमधील वाढता हस्तक्षेप पहाता नेपाळमधील बिराटनगर, मोरंग आणि खाबरहुब भागांमध्ये चीनच्या विरोधात राष्ट्रीय एकता अभियानाच्या अंतर्गत आंदोलन करण्यात आले. या वेळी चीनच्या विरोधात घोषणाबाजी करत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा पुतळा जाळण्यात आला. यापूर्वी राष्ट्रीय एकता अभियानाच्या अंतर्गत १३ जानेवारीला काठमांडू येथे निदर्शने करून चीनच्या राजदूत होऊ यांकी यांचे छायाचित्र जाळण्यात आले होते.

चीनने नेपाळी व्यापार्‍यांची मुस्कटदाबी करण्यासाठी सीमेवर अनौपचारिकरित्या नाकाबंदी केली आहे. चीनच्या विश्‍वविद्यालयांमध्ये शिकणार्‍या नेपाळी तरुणांना वैद्यकीय पदवी प्राप्त करण्यास अडथळे आणण्यात येत आहेत, असेही समोर आले आहे.