|

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्ये करणार्यांच्या विरोधात विशेष कायदा संमत करावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज तथा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले,
१. हा कायदा असा करण्यात यावा की, परत कुणीही काही बोलण्याचे धाडस करू नये. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अपशब्द उच्चारण्याचे धाडस कुणीही करू नये. यासाठी अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा रणे आवश्यक आहे.
२. या कायद्यात न्यूनतम १० वर्षांची शिक्षा आणि अधिकाधिक रकमेचा दंड झाला पाहिजे, असे प्रावधान असावे. अशा घटनांची चौकशी पोलीस उपअधीक्षकांकडून झाली पाहिजे. अशा प्रकरणातील दोषारोपपत्र किमान ३० दिवसांत प्रविष्ट झाले पाहिजे आणि या गुन्ह्याचा निकाल ६ मासांत लागला पाहिजे.
३. महाराष्ट्र सरकारने यासाठी याच अधिवेशनात हा विशेष कायदा संमत करावा, अशी मागणी मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने करत आहे. हा कायदा केला पाहिजे, नाही केला तर गोंधळ होतो. सभागृहातही याच विषयावरून गदारोळहोतो, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी हा गदारोळ बंद करण्यासाठी कायदा संमत करावा.
४. कायदा संमत न केल्यास महाराष्ट्रातील लोक तुम्हाला क्षमा करणार नाहीत.