|
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले ‘रूपे कार्ड’ देण्यात येणार आहे. ‘मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस’ त्यात उपलब्ध आहे. याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि विमा मिळणार आहे. पैसे भरण्यासाठी ‘क्यु.आर्. कोड’ही देण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप अन् कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या कार्डचे या वेळी अनावरण करण्यात आले. देशात ‘रूपे कार्ड’ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आणि बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांसह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.