Kerala Governor On BhagavadGita : केवळ श्रीमद्‌भगवद्‌गीताच मानवतेचे कल्याण करेल !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचे विधान

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

चंडीगड – श्रीमद्‌भगवद्‌गीतेत उपनिषद आणि वैदिक ग्रंथ यांची मूलभूत तत्त्वे असून ती भारताची एकता आणि अखंडता दर्शवतात. भगवद्‌गीतेमुळे मानवाचा लाभ होईल. केवळ भगवद्‌गीताच मानवतेचे कल्याण करेल, असे विधान केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केले. ते हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापिठात ९ व्या आंतरराष्ट्रीय गीता परिषदेत बोलत होते. या वेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह हेही उपस्थित होते.

१. राज्यपाल खान पुढे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गीतेच्या भूमिकेवर भर दिला पाहिजे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश जगभर पसरवला गेला पाहिजे.

२. तसेच उत्तराखंडाचे राज्यपाल गुरमीत सिंह यांनी म्हटले की, भगवद्‌गीता लोकांना संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्यास साहाय्य करते. भगवद्‌गीतेची शिकवण आणि हरियाणाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी कुरुक्षेत्र विद्यापिठाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

३. भगवद्‌गीता सर्व मानवतेच्या कल्याणासाठी पवित्र ग्रंथ असल्याचे हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी म्हटले.

संपादकीय भूमिका

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली शाळेत श्रीमद्‌भगवद्‌गीता शिकवण्यास विरोध करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?