मुंबई – बारामती ॲग्रो घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची १ फेब्रुवारी या दिवशी दुसर्यांदा अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) चौकशी चालू केली. ३१ जानेवारी या दिवशी त्यांची १२ घंटे चौकशी झाली होती. याच प्रकरणी यापूर्वी २४ जानेवारी या दिवशीही त्यांची ‘ईडी’कडून ११ घंटे चौकशी करण्यात आली होती.
#WATCH एनसीपी-शरद पवार गुट के नेता रोहित पवार मुंबई में ईडी कार्यालय से निकले।
महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बैंक घोटाला मामले में ईडी ने रोहित पवार को आज एजेंसी के सामने पेश होने के लिए बुलाया था। pic.twitter.com/LNDtU2RjpC
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2024
आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ बारामती तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन या कारवाईचा निषेध केला. या वेळी कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. नागपूर आणि सोलापूर येथेही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
काय आहे प्रकरण ?
रोहित पवार यांची चौकशी होत असलेले प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. ५ जानेवारी या दिवशी ‘ईडी’च्या अधिकार्यांनी रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ आस्थापनासह ६ ठिकाणी धाडी घातल्या होत्या. कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर त्याचा शिखर बँकेच्या वतीने लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक आस्थापनांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते. लिलावाच्या या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता. या प्रक्रियेंतर्गत अवघ्या ५० कोटी रुपयांत ‘बारामती ॲग्रो’ने आस्थापन कन्नड सहकारी साखर कारखान्याने खरेदी केल्याचा आरोप आहे. हायटेक आस्थापनाने लिलावासाठी जी ५ कोटी रुपयांची प्राथमिक रक्कम भरली होती, ती रक्कम आस्थापनाने ‘बारामती ॲग्रो’कडून घेतल्याची चर्चा आहे. यात ‘मनी लॉड्रिंग’ झाल्याचे सूत्र समोर आल्याने ‘ईडी’ने या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले. |