नाशिक येथे विमा प्रतिनिधीकडून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

फसवणूक केलेली ही सर्व रक्कम वसूल करून घ्यायला हवी !

मनमाड (नाशिक) – विमा प्रतिनिधी सुभाष देशमुख यांनी ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. येथील युनियन बँकेत हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत. संतप्त ठेवीदारांनी बँकेसमोर गर्दी केली. देशमुख याने शेकडो मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी आणि नूतनीकरण करण्यासाठी बेअरर धनादेश घेतले आणि स्वतःच्या नावावर परस्पर वटवून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठेवीदारांचा आरोप आहे. ४ जणांच्या चौकशी समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी चालू आहे.