भारतीय सीमेवर चीनच्या प्रक्षोभक कुरापती असल्याने भारताला साथ दिली पाहिजे !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या उप साहाय्यकांचे आवाहन !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे उप साहाय्यक आणि समन्वयक कर्ट कॅम्पबेल

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत-चीन सीमेवर चिनी घुसखोरीसह संघर्ष वाढला आहे. यामुळे मोठा संघर्ष होण्याची भीती आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताला साथ दिली पाहिजे, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे उप साहाय्यक आणि समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी केले आहे. ते एका परिसंवादामध्ये बोलत होते.

कर्ट कॅम्पबेल म्हणाले की, चीन वर्ष २०२० पासून पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर एकतर्फी पालट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची ही कुरापत शांततेसाठी गंभीर धोका आहे. भारताचे मित्र देश आणि भागीदार यांविषयी तीव्र चिंतेत आहेत.