जगभरात स्वहिताचे वातावरण निर्माण करण्यासाठी चीनकडून अब्जावधी डॉलर खर्च (China narrative) !

अमेरिकेच्या (United States) एका अहवालातील दावा
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्याचा चीनचा प्रयत्न !

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनी झेलेंस्की यांना फटकारले !

युक्रेनमध्ये निवडणुका घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी अमेरिकेकडे निधी मागितल्याचे प्रकरण !

‘आधुनिक भारत-अमेरिका संबंधां’चे शिल्पकार आहेत डॉ. एस्. जयशंकर !

गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका जवळ आले असले, तरी अमेरिकेची मूळ मनोवृत्ती भारत ओळखून आहे, हे विसरता कामा नये !

कॅनडाकडून आतंकवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांना मोकळीक !

जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात त्यांच्यावर सरकारने  कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये. 

हवामान पालटाच्या विरोधात विकसित देश निष्क्रीय ! – भारताची रोखठोक भूमिका

आतापर्यंत विकसित देशांना त्यांच्या गैरकृत्यांवर विचारणारे कुणी नव्हते, किंबहुना तसे करण्यास अन्य कोणताही देश धजावत नसे. भारताच्या अशा भूमिकेमुळे विकसित देशांना चपराक बसत आहे !

अमेरिकेच्या संसदेत श्री श्री रविशंकर आणि आचार्य लोकेश मुनी यांच्या शांततेच्या कार्याचे कौतुक !

श्री श्री रविशंकर गेल्या ४० वर्षांपासून ध्यान आणि योग यांच्या बळावर जगातील लोकांना आंतरिक शांतीसाठी मार्गदर्शन करत आहेत. जगातील एकतरी इस्लामी धर्मगुरु असे कार्य करतात का ?

अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांची पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.

जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली असून ते हवेत गोळीबार करत आहेत ! – मायकेल रुबिन, अमेरिकेचे माजी अधिकारी

मला वाटते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी अशा पद्धतीने भारतावर आरोप केले आहेत, ज्याचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत.

तुर्कीयेने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये पुन्‍हा उपस्‍थित केले काश्‍मीरचे सूत्र !

तुर्कीयेचे राष्‍ट्रपती रेसेप तय्‍यिप एर्दोगान यांनी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या महासभेमध्‍ये पुन्‍हा एकदा काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित केले. ते म्‍हणाले, ‘भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील चर्चा आणि सहकार्य यांद्वारे काश्‍मीरमध्‍ये स्‍थायी आणि न्‍यायपूर्ण शांतता निर्माण होऊ शकते.

जस्टिन ट्रुडो यांची कृती वेडगळपणाची असल्याने अमेरिकेने त्यांच्या बाजूने उभे राहू नये ! – अमेरिकेतील अभ्यासक

भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावर अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल रुबिन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या वेळी म्हटले की, जस्टिन ट्रुडो अशा लोकांच्या सल्ल्याने हे सर्व करत आहेत, ज्यांना खलिस्तानी चळवळ ही त्यांच्या लाभाची वाटते.