तुर्कीयेने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये पुन्‍हा उपस्‍थित केले काश्‍मीरचे सूत्र !

‘काश्‍मीर भारताचा अविभाज्‍य भाग असतांना तुर्कीयेने यात नाक खुपसू नये’, असे भारताने त्‍याला सुनवावे !

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – तुर्कीयेचे राष्‍ट्रपती रेसेप तय्‍यिप एर्दोगान यांनी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या महासभेमध्‍ये पुन्‍हा एकदा काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित केले. ते म्‍हणाले, ‘भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील चर्चा आणि सहकार्य यांद्वारे काश्‍मीरमध्‍ये स्‍थायी आणि न्‍यायपूर्ण शांतता निर्माण होऊ शकते. दक्षिण आशियामध्‍ये शांतता, स्‍थैर्य आणि समृद्धी यांचा मार्ग स्‍थापित करण्‍यासाठी हे अत्‍यावश्‍यक आहे.’ गेली २-३ वर्षे एर्दोगान यांनी महासभेमध्‍ये काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित केले होते.