अमेरिकेच्या संसदेत श्री श्री रविशंकर आणि आचार्य लोकेश मुनी यांच्या शांततेच्या कार्याचे कौतुक !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या संसदेने भारतातील धर्मगुरु श्री श्री रविशंकर आणि आचार्य लोकेश मुनी यांनी जागतिक स्तरावर शांतता अन् सद्भाव प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरून कौतुक केले आहे.

अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, श्री श्री रविशंकर गेल्या ४० वर्षांपासून ध्यान आणि योग यांच्या बळावर जगातील लोकांना आंतरिक शांतीसाठी मार्गदर्शन करत आहेत. यामुळे लोकांना आंतरिक शांती मिळत आहे. यामुळे जगात हिंसेमध्ये घट होऊ शकते.

आचार्य लोकेश मुनी यांच्याविषयी राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आचार्य लोकेश मुनी यांनी स्वतःला जैन धर्म, बौद्ध धर्म आणि वेदिक दर्शन यांसाठी समर्पित केले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी धार्मिक हिंसाचार अल्प करण्यासाठी साहाय्य केले. त्यांनी भारतातील गुरुग्राम येथे विश्‍व शांती केंद्र उघडले आहे. त्यांच्या कामामुळे जगभरातील लोकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.

संपादकीय भूमिका

जगातील एकतरी इस्लामी धर्मगुरु असे कार्य करतात का ?