‘भारत रक्षा मंचा’च्या वतीने  पुणे येथे व्याख्यानाचे आयोजन !

पुणे – भारत रक्षा मंच, पुणे यांच्या वतीने एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १३ एप्रिल २०२५ या दिवशी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत डेक्कन जिमखाना कॉर्नर, पुणे येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र’ येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमातील वक्ते आणि विषय

१. श्री. प्रशांत कोतवाल, भारत रक्षा मंच :  हलालचे अर्थकारण

२. श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती :  अर्बन नक्षलवाद

३. श्री. सूर्यकांत केळकर, भारत रक्षा मंच : बांगलादेशी घुसखोरीची समस्या आणि समाधान