मद्याचे दुकान हटवण्यासाठी ग्रामस्थांचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन !

खामगाव फुलंब्री (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – तालुक्यातील पिंपरी येथे चालू असलेले अवैध देशी मद्याचे दुकान तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वडोदबाजार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी येथे अवैध देशी मद्याचे दुकान आहे. या दुकानामुळे गावातील तरुण मद्याच्या आहारी गेले आहेत. शिवाय अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे तातडीने येथील देशी मद्याचे दुकान बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ग्रामस्थांनी निवेदनात दिली आहे. या निवेदनावर सरपंच कविता संजय एरंडोले, उपसरपंच गणेश बांबर्डे,  माजी सरपंच पंढरीनाथ देवरे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत

संपादकीय भूमिका

  • मद्याचे दुकान हटवण्यासाठी जनतेला आंदोलन करण्यास भाग पाडणारे पोलीस अकार्यक्षमच !
  • मद्याचे दुकान हटवण्यासाठी आंदोलन का करावे लागते ? जी गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येते, ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात का येत नाही ?