टेंपोचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद
लांजा – राजापूर बसस्थानकाच्या जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात २० फेब्रुवारीला कारवाई केली. या वेळी पथकाने ९२ लाख रुपयांचा मद्याचा साठा, भ्रमणभाष संच आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला टेंपो, असा एकूण १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.
गोवा राज्यातून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर एस्.टी. बसस्थानकाच्या समोर पथकाने सापळा रचून टेंपो कह्यात घेतला. या प्रकरणी टेंपोचालक साहील कमरु खान (रहाणार हरियाणा) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.