|

नवी देहली – प्राचीन भारतीय धर्मशास्त्रांतील ‘सात्त्विकता’, धर्माचरण, भारतीय गायीचे महत्त्व आणि नामजप हेच खर्या अर्थाने शाश्वत विकासाचे मुख्य घटक आहेत. केवळ पर्यावरणपूरक तंत्रज्ञान नव्हे, तर आध्यात्मिक शुद्धतेवर आधारित विचारसरणीविना मानवी जीवन आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित रहाणार नाही, असे संशोधन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी देहली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्रामीण आर्थिक परिषदे’त (‘रूरल इकॉनॉमिक फोरम’मध्ये) मांडण्यात आले. या संशोधनाचे सादरीकरण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क यांनी केले. या संशोधनाचे मार्गदर्शक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत.
“Sustainable development is impossible without Sattvikta (spiritual purity) and Dharma (righteous conduct)!” – Sean Clarke
📍Rural Economic Forum 2025, Delhi #REF2025
📊 Research by Maharshi Adhyatma Vishwavidyalay, guided by founder Sachchidananda Parabrahman (Dr) Athavale.… pic.twitter.com/6UK5KUKjhQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 12, 2025
श्री. शॉन क्लार्क म्हणाले की,

१. औद्योगिक क्रांतीपासून आजवर विकासाच्या मार्गात पर्यावरणाचा विचार फारसा झाला नाही. ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना वर्ष १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत मांडली गेली खरी; पण ५० वर्षांनंतरही त्याची कार्यवाही प्रभावीपणे झालेली नाही.
२. आजच्या पर्यावरणीय संकटांची कारणे मानवी मनोवृत्तीत असलेल्या असात्त्विकतेत आहेत. म्हणूनच ‘विकास’ ही केवळ भौतिक संकल्पना न रहाता ती आध्यात्मिकदृष्ट्याही सात्त्विक असली पाहिजे, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
३. ‘जीडीव्ही बायोवेल’ या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या एका प्रयोगात असे लक्षात आले की, अंघोळीच्या पाण्यात गोमूत्राचे काही थेंब घातल्यावर व्यक्तीच्या देहातील सप्तचक्रे ६५ ते ७८ टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात, तर गोमूत्राचे काही थेंब प्राशन केल्यावर ती ९० टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात. गाय जेथे वावरते, त्या परिसरातील सकारात्मक स्पंदने २२ टक्क्यांनी वाढतात. गोमूत्राच्या वापरातून त्वचारोग आणि आरोग्य यांवर सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे गायीपासून मिळणारी उत्पादने ही ग्रामीण भारतासाठी समृद्धीची गुरुकिल्ली ठरू शकते.
४. अनेक विकार आणि व्यसनाधीनता यांचा उगम आध्यात्मिक कारणांमुळे असतो, हे संशोधनातून अधोरेखित झाले. ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपामुळे व्यसनमुक्ती, मानसिक स्थैर्य आणि प्रारब्धजन्य विकारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ३ मास नियमितपणे केल्यामुळे २० वर्षे जुना एक्झिमा (त्वचारोग) केवळ नामजपाने बरा झाल्याचे उदाहरण या वेळी देण्यात आले.
५. एकूणच अध्यात्मशास्त्रानुसार सध्या जगात पर्यावरणातील पालट आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम टाळण्यासाठी केले जाणारे उपाय हे वरवरचे आहेत. जगात असात्त्विकता वाढल्याने त्याचा विपरित परिणाम संपूर्ण विश्वाच्या हवामानाचे संचलन करणार्या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर होतो. वातावरणातील सात्त्विकता वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे साधना करणे होय. असे झाले, तरच भारत हा खर्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ बनेल.
REF2025 Session 5 – Vocal for Local & Local for Global: Bharat’s Global Impact
In this session grassroots leaders, visionary thinkers, and change makers came together to reimagine the power of rural India on the global stage. From ancient wisdom to cutting-edge innovation,… pic.twitter.com/8Q9TKccLGc
— India Chamber of Business & Commerce (@IChamberOrg) April 5, 2025
![]() महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आतापर्यंत ११८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून त्यापैकी १४ परिषदांमध्ये ‘सर्वोत्तम सादरीकरण’ पुरस्कार मिळवले आहेत. |