‘फॉग कॅनॉन’ यंत्र वापरून प्रदूषण अल्प करण्याचा पुणे महापालिका प्रयत्न करणार !

पुणे – रस्त्यावरील, तसेच हवेतील प्रदूषण अल्प करण्यासाठी पुणे महापालिका ‘फॉग कॅनॉन’ यंत्राचा वापर करणार आहे. या यंत्राद्वारे पाण्याची फवारणी केल्याने हवेतील धूलीकणांचे प्रमाण अल्प होण्यास साहाय्य होईल. महापालिकेने यासाठी ५ ‘फॉग कॅनॉन’ यंत्रे खरेदी केली आहेत. या यंत्रांमधून पाण्याचे अतीसूक्ष्म कण बाहेर फेकले गेल्याने हवेतील धूलीकणांचे प्रमाण अल्प होण्यास साहाय्य होईल. हे यंत्र देहली, चंदीगढ, पिंपरी-चिंचवडसह पुण्ो येथेही वापरण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’ अंतर्गत देशातील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असणार्‍या शहरांमधील प्रदूषण अल्प करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार महापालिका हा उपक्रम राबवत आहे. शहरातील महापालिका भवन ते वारजे, स्वारगेट, कात्रज, कोंढवा, शेवाळेवाडी, संगमवाडी, येरवडा, केसनंद फाटा, दांडेकर पूल ते धायरी फाटा या रस्त्यांवर ही फवारणी होईल.