शेतीच्‍या यांत्रिकीकरणासाठी राज्‍यशासन करणार ब्राझीलमधील शेतीचा अभ्‍यास

ब्राझीलच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना कृषीमंत्री धनंजय मुंडे (डावीकडे)

मुंबई – ब्राझीलमधील शेतीच्‍या यांत्रिकीकरणाचा अभ्‍यास करून त्‍याप्रमाणे महाराष्‍ट्रात शेतीची उत्‍पादकता वाढावी, यासाठी राज्‍यातील कृषी विद्यापिठांच्‍या संशोधकांना ब्राझील येथे पाठवण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासन करत आहे.

ब्राझीलमधील वरिष्‍ठ अधिकार्‍यांच्‍या एका शिष्‍टमंडळासमवेत २६ सप्‍टेंबर या दिवशी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची याविषयी मुंबई येथे प्राथमिक चर्चा झाली. या वेळी धनंजय मुंडे यांनीही महाराष्‍ट्रातील पारंपरिक शेती आणि नवनवीन प्रयोग यांविषयी ब्राझीलच्‍या शिष्‍टमंडळाला माहिती दिली.