औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असणे, हा शिवरायांचा अपमान ! – शिवसेना

जे निजामी अवलादीचे आहेत, ते औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे.

मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’च्या कायद्याचे कठोर पालन करून दोषींवर कारवाई केली जाईल ! – शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात शिवराजसिंह चौहान यांनी सपत्नीक लघुरुद्र अभिषेक करून पूजा केली.

प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात

वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २४ महसुली गावांतील गावठाण क्षेत्राचे नगर भूमापन होणार !

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २४ महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे, भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज सिद्ध करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सांडपाण्याच्या नाल्यावर प्राचीन मंदिराचा स्तंभ ठेवण्यात आल्याचे छायाचित्र ट्विटर प्रसारित झाल्यावर हिंदूंचा संताप

हिंदूंच्या संतापानंतर प्रशासन, पोलीस आणि पुरातत्व विभाग सक्रीय – हिंदूंना त्यांच्या प्राचीन सांस्कृतिक ठेव्याचे मोल नसल्याने ते अशा प्रकारची कृती करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात ! तसेच सरकार, प्रशासन आणि पुरातत्व विभागही निष्क्रीय रहाते !

आंध्र नव्हे, ख्रिस्तीप्रदेश !

भाजपने जगनमोहन सरकारला पाठिंबा दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारनेही या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यातून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करू शकतो. अन्यथा उद्या आंध्रप्रदेश ‘ख्रिस्तीप्रदेश’ म्हणून ओळखला जाऊ लागला, तर आश्‍चर्य नव्हे !

गोव्यात जानेवारीत कोरोनाचा संसर्ग वाढणार ! – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांची चेतावणी

राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून पर्यटकांच्या मेजवान्या कोणी होऊ दिल्या ? पोलीस आणि प्रशासन यांनी या पर्यटकांकडून कोरोनाविषयीच्या नियमावलीचे पालन का करून घेतले नाही ?

विरोध डावलून शासन मेळावली (सत्तरी) येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार

गोवा शासन स्थानिकांचा विरोध डावलून मेळावली, सत्तरी येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जानेवारी या दिवशी ‘आयआयटी’च्या पदाधिकार्‍यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले होते.

वेल्लोर (तमिळनाडू) येथे शिष्यवृत्ती देण्याच्या नावाखाली लोकांना लुटणार्‍या पाद्रयाला अटक

पाद्रयांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात भारतातील प्रसारमाध्यमे नेहमीच मौन बाळगतात; मात्र हिंदूंच्या संतांच्या विरोधातील खोट्या आरोपांना भरभरून प्रसिद्धी देतात, हे लक्षात घ्या !

भ्रमणभाष सुविधा सुधारण्यासाठी २०० भ्रमणभाष मनोरे उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘भ्रमणभाष मनोरे उभारल्याने विद्यार्थी, ‘आयटी’ व्यावसायिक, ‘टॅक स्टॉर्टअप’ आदी समाजाच्या विविध घटकांना लाभ होणार आहे.’’