प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात

मुंबई – पी.एम्.सी. बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता कह्यात घेतली आहे. पी.एम्.सी. बँकेतील ४ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी मासात अटक केली होती. पी.एम्.सी. बँकेचे ९० कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर ५५ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. हा व्यवहार का करण्यात आला होता, याचे उत्तर सक्तवसुली संचालनालयाला हवे आहे. याचसाठी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे.