अजूनही शौचालयेच ?

‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

‘व्हॉट्सअ‍ॅप’चे गोपनीयता धोरण रोखण्यात यावे !

व्हॉट्सअ‍ॅप हे धोरण १५ मेपासून सर्व वापरकर्त्यांना अनिवार्य करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या गोपनीयता धोरणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ लाखाहून थेट ४१ लाखांवर पोचली !

असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्‍चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !

म्हादईची पहाणी करण्यासाठी गेलेल्या गोव्याच्या पथकाला कर्नाटक पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक

कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांनी चोर्ला घाटापासून ते कळसा येथील म्हादई प्रकल्पापर्यंत पोलिसांना पहारा ठेवण्याचा आदेश दिला आहे.

इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी कदंब वाहतूक महामंडळाकडून निविदा

कंदब महामंडळाकडून पुढच्या आठवड्यात ५० विजेवर चालणार्‍या बसगाड्या चालू करण्यात येतील.

वेळागर येथे होत असलेल्या ‘पॅरासिलिंग’च्या विरोधात मासेमारांचे काम बंद आंदोलन

केरवाडा येथील ६०० ते ७०० संतप्त मासेमारांनी १९ मार्चला मासेमारी व्यवसाय बंद ठेवून वेळागर येथे आंदोलन केले.

वैभववाडी तालुक्यातील अवैध सिलिका वाळू उत्खननाच्या विरोधात महसूल विभागाकडून कारवाई चालू

कासार्डेसहित तालुक्याच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात सिलिका मायनिंग चालू आहे.

संपूर्ण कोकण उद्ध्वस्त करणार्‍या नाणार प्रकल्पाला कोकणवासियांनी विरोध करावा ! – प्रा. महेंद्र नाटेकर, स्वतंत्र कोकण राज्य संघटना

कोकणचा विकास नको;पण ते भकास तरी करू नका !

सातारा येथील नारायण सारंगकर यांची पोलीस निरीक्षक पदावरून १ वर्षासाठी पदावनती !

वादग्रस्त ठरलेले शहर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे पोलीस विभागीय चौकशी अंतर्गत वेगवेगळ्या दोषारोपांपैकी ३ दोषारोपांमध्ये दोषी आढळून आले आहेत. यामुळे पोलीस महासंचालकांनी १ वर्षासाठी सारंगकर यांना पदावनतीची शिक्षा ठोठावली आहे.

वैद्यकीय कर्मचार्‍यांवरील आक्रमणाच्या विरोधातील कारवाईमधील त्रुटी शोधण्यासाठी शासन तज्ञांची समिती स्थापन करणार

उपचाराच्या वेळी रुग्णांच्या नातेवाइकांकडून भावनेच्या भरात अनेकदा रुग्णाचा मृत्यू झाल्यास किंवा अप्रिय घटना घडल्यास रुग्णालयाची तोडफोड केली जाते. काहीवेळा उपस्थित आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले जाते.