संपूर्ण चौकशी अंती कारवाई होणार
वैभववाडी – तालुक्यातील अवैध सिलिका वाळू उत्खननाच्या विरोधात आता महसूल विभागाने कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. या अंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी प्रांताधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदारांचा समावेश असलेल्या ५ पथकांकडून ही तपासणी करण्यात येत आहे. सर्व पडताळणी झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
कासार्डेसहित तालुक्याच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात सिलिका मायनिंग चालू आहे. यात लीजधारकांची संख्या अल्प आणि अनधिकृतरित्या उत्खनन करणार्यांची संख्या अधिक असल्याचे समजते. महसूल विभागाचे अनुमाने २५ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कासार्डे भागात तपासणी करत आहेत.