इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी कदंब वाहतूक महामंडळाकडून निविदा

पणजी, १९ मार्च (वार्ता.)-  कदंब वाहतूक महामंडळाने विजेवर चालणार्‍या ५००  (इलेक्ट्रीक) बसगाड्यांची खरेदी करून त्या भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी निविदा मागवली आहे. बसगाड्यांमध्ये स्लीपर कोच आणि लक्झरी बसगाड्या, तसेच याठी आगार अन् प्रत्येक बसस्थानकावर लागणार्‍या पायाभूत सुविधा हे सर्व अंतर्भूत करून ‘प्रत्येक दिवशी प्रत्येक बसचा दर’, या तत्त्वावर ही निविदा मागवण्यात आली आहे. कंदब महामंडळाकडून पुढच्या आठवड्यात ५० विजेवर चालणार्‍या बसगाड्या चालू करण्यात येतील. २३ मार्च २०२१ या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अधिकृतरिया या बसगाड्या चालू करण्यात येतील.