सातार्‍यात फडकणार ७५ फूट उंच राष्ट्रध्वज

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारणीचे काम चालू आहे.

बिहार सरकारने ‘शुक्रवारी’ सुटी देण्यात येणार्‍या शाळांची सूची मागवली !

बिहारमधील ५०० शाळांना रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी देण्याचे प्रकरण

सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत करण्याचा मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

अमराठी अधिकार्‍यांना मराठी भाषा शिकून घेण्याचे निर्देश

निकृष्ट काम केलेले ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होणार ! – पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुन्हा कंत्राट मिळण्यासाठी ठेकेदार चांगले काम करत नाहीत कि निकृष्ट साहित्य वापरून चांगल्या साहित्याचे पैसे लाटले जातात कि रस्ते चांगल्या प्रकारे दुरुस्त न करण्यामागे अन्य काही कारणे आहेत ?, हे जनतेसमोर आले पाहिजे !

रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवणार ! – पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका

तसेच शहराच्या विविध भागांत २४ कोटी रुपयांच्या निधीतून होणारे १७ रस्त्यांचे काम येत्या १५ दिवसांत चालू होईल, अशी माहिती सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनी उभी करण्यासाठी ‘दूरदर्शन’ची उपकरणे चोरून विकण्यात आली !

काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रत्येक क्षेत्रांत हिंदुद्वेष्ट्यांना पुढे आणण्यात आले. प्रसारमाध्यमांमध्येही हीच स्थिती होती, हे या आरोपातून सिद्ध होते.

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या आणि सोनिया गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी केली.

कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना राज्यशासन ५० सहस्र रुपये प्रोत्साहन निधी देणार !

राज्यातील १३ लाख ८५ सहस्र शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी ५ सहस्र ७२२ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

पन्हाळागड येथे पर्यटकांना मद्यपान करू देणार्‍या ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद !

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर एका झुणका-भाकरी केंद्रावर काही जणांच्या गटाने मद्यपान केले होते. या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ प्रसिद्धीमाध्यमांवर प्रसारित झाला होता. याविषयी पोलिसांनी ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद केला आहे.

युक्रेनहून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामावून घेता येणार नाही ! – केंद्र सरकार

युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे २० सहस्र भारतीय विद्यार्थी भारतात परतले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्याची विनंती केली आहे.