देशातील अनेक राज्यांत अचानक मरत आहेत पक्षी !

रोममध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त आतषबाजी करण्यात आल्याने सहस्रोच्या संख्येने पक्षी रस्त्यावर मरून पडल्याच्या घटनेला ४ दिवस झाले असतांनाच भारतातील काही राज्यांमध्येही अचानक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

विदर्भवासियांनो, तुमच्यावर अन्याय होणार नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मी विदर्भवासियांना वचन देतो की, तुमच्यावर अन्याय होणार नाही. कुणी अन्याय करत असेल, तर ढाल बनून उभे राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मंत्रालयातील उपाहारगृहाची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्यशासनाने परिपत्रक काढले

मंत्री आणि अधिकारी यांच्या कार्यालयांच्या उधारीसाठी शासनाला परिपत्रक काढावे लागणे, हे राज्यासाठी लाजिरवाणे होय !

१५ जानेवारीपासून राज्यव्यापी शाळा बंद करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची चेतावणी 

देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो.

‘शिवशाही’ वातानुकूलित शयनयान सेवा एस्.टी. महामंडळाकडून बंद

एस्.टी. महामंडळाला सातत्याने होत असलेल्या तोट्यामागे कुणाचे आर्थिक लागेबांधे आहेत का ?, तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करून केवळ अडीच वर्षांत ही सेवा बंद करण्याची वेळ का आली ? याचे चिंतनही एस्.टी. महामंडळाने करावे.

पालिका निवडणूक पक्ष पातळीवर घेण्याचा निर्णय नाही ! – डॉ. प्रमोद सावंत

पालिका निवडणूक पक्ष पातळीवर घेण्याविषयी अजूनही निर्णय झालेला नाही. याविषयी चर्चा चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात  

शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण होत आहे.

सर्व शहरांचे नामांतर करणे योग्य नाही ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या नात्याने धरसोड वृत्ती सोडून ठाम भूमिका घ्यावी.

सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पुस्तक बँक’ चालू !

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ आणि ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने पुस्तक दान हा उपक्रम हाती घेतला आहे.

औरंगाबादच्या नामांतराविषयी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत.