रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवणार ! – पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका

पी. शिवशंकर (उजवीकडे )

सोलापूर – पावसामुळे येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. श्री गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्यात येणार आहेत, तसेच शहराच्या विविध भागांत २४ कोटी रुपयांच्या निधीतून होणारे १७ रस्त्यांचे काम येत्या १५ दिवसांत चालू होईल, अशी माहिती सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्ते खड्डेमय झाले आहेत. याविषयी आयुक्त शिवशंकर म्हणाले की, पावसाळा असेपर्यंत रस्त्यांच्या कामांमध्ये डांबरीकरणाच्या आधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतरच डांबरीकरण होईल.