सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत करण्याचा मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

अमराठी अधिकार्‍यांना मराठी भाषा शिकून घेण्याचे निर्देश

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर

मुंबई – मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेत करण्याचे निर्देश पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत. ‘आयुक्तांना पाठवले जाणारे सर्व अहवाल मराठीत द्यावेत. अन्य भाषांतील अहवाल स्वीकारले जाणार नाहीत. अमराठी अधिकार्‍यांनी मराठीत संवाद साधण्यासाठी मराठी भाषा व्यवस्थित शिकून घ्यावी’, असे निर्देशही विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत.