‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनी उभी करण्यासाठी ‘दूरदर्शन’ची उपकरणे चोरून विकण्यात आली !

  • वरीष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांचा खळबळजनक आरोप
  • तत्कालीन सरकारने वृत्तवाहिनीला पैसे देऊन मोठे केल्याचाही आरोप

नवी देहली – हिंदुद्वेषी वृत्तवाहिनी ‘एन्.डी.टी.व्ही.’वर दूरदर्शनचे सल्लागार संपादक आणि वरिष्ठ निवेदक अशोक श्रीवास्तव यांनी गंभीर आरोप केले आहेत. श्रीवास्तव यांनी, ‘दूरदूर्शनचे तत्कालीन महानिर्देशक भास्कर घोष (वर्ष १९८६-८८) यांनी ‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनीला मोठ्या प्रमाणात साहाय्य केले होते. ‘एन्.डी.टी.व्ही.’ने ‘दूरदर्शन’ वाहिनीची उपकरणे आणि विविध विषयांवरील ध्वनीमुद्रण चोरले होते.

हे सर्व विकून ‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनी उभी करण्यात आली. त्या काळात सरकारने वृत्तवाहिनीला पैसे देऊन मोठे केले. ‘काँग्रेसच्या सत्ताकाळात एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनीने सरकारी संपत्तीचा दुरुपयोग केला. वृत्तवाहिनी उभी करण्यासाठी तिला अवैध पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले’, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. ‘इंडिया स्पीक्स डेली’ या यू ट्यूब वाहिनीवरील मुलाखतीत श्रीवास्तव यांनी हे आरोप केले. ‘एन्.डी.टी.व्ही.’ने अजून याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

भास्कर घोष हे हिंदुद्वेष्ट्या पत्रकार सागरिका घोष यांचे वडील आहेत. गेल्या वर्षी वृत्तवाहिनीचे प्रमुख प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी अवैध पद्धतीने कोट्यवधी रुपये कमावल्याचा ठपका ठेवत त्यांतील ५० टक्के रक्कम म्हणजे तब्बल १६.९७ कोटी रुपये सरकारकडे जमा करावी, असा त्यांना ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज ऑफ इंडिया’ने (‘सेबी’ने) आदेश दिला होता.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रत्येक क्षेत्रांत हिंदुद्वेष्ट्यांना पुढे आणण्यात आले. प्रसारमाध्यमांमध्येही हीच स्थिती होती, हे या आरोपातून सिद्ध होते. अशा हिंदुद्वेष्ट्या पक्षाने स्वातंत्र्यानंतर भारतावर बहुतांश काळ राज्य केले, हे लज्जास्पद ! आता हा पक्ष आणि ‘एन्.डी.टी.व्ही.’सारख्या हिंदुद्वेषी वाहिन्या इतिहासजमा करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !