सातार्‍यात फडकणार ७५ फूट उंच राष्ट्रध्वज

सातारा, ३० जुलै (वार्ता.) – येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नवीन मुख्य इमारतीसमोर ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री मागवून युद्धपातळीवर काम चालू आहे. १४ ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. देशात सर्वच ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारणीचे काम चालू आहे.