वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गीता प्रेसच्या अभिनंदनाचा, तर काँग्रेसच्या निषेधाचा प्रस्ताव एकमताने संमत !

काँग्रेसकडून भारतात हिंदूविरोधी वक्तव्य केले जाते, तर भारताबाहेर देशविरोधी वक्तव्य केले जाते. अशा काँग्रेसचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निषेध करते.

नक्षलवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांची देशविरोधी युती ! – अधिवक्ता (सौ.) रचना नायडू, छत्तीसगड

नक्षलवाद्यांकडून वनवासी मुलांच्या हातांमध्ये बलपूर्वक बंदुका दिल्या जात आहेत. नक्षलवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास नकार देणार्‍यांची क्रूरपणे हत्या करण्यात येते.

तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा ! – श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्यभूमी आहे. नवीन संसदेमध्ये नेण्यात आलेला ‘सांगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्यात आला.

निविदा प्रक्रियेतील आरोपांमुळे पुणे शहरातील अद्याप ६० किलोमीटर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती अपूर्ण !

पावसाळा तोंडावर आला असतांनाही निविदा प्रक्रियेवर झालेल्‍या आरोप-प्रत्‍यारोपातून अनेक रस्‍त्‍यांची कामे प्रलंबित राहिली आहेत. शहरातील १०० किलोमीटर लांबीच्‍या रस्‍त्‍यांपैकी केवळ ४० किलोमीटर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती झाली आहे.

भ्रमणभाष चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणीला पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांत ४.३० घंटे हेलपाटे मारायला लावले !

भ्रमणभाषसंच गहाळ आणि चोरी या प्रकारांत पोलीस तक्रार प्रविष्ट करण्यास नेहमी टाळाटाळ करतात. गुन्ह्यांची संख्या वाढू नये, यासाठी पोलीस केवळ भ्रमणभाष गहाळ झाल्याचा अर्ज भरून घेत असल्याचे सांगितले जात आहे.

गोरखपूरमधील सुप्रसिद्ध ‘गीता प्रेस’ला म. गांधी शांतता पुरस्कार घोषित !

आतापर्यंत गीता प्रेसकडून श्रीमद् भगवद्गीतेच्या १६ कोटी २१ लाख प्रती प्रकाशित !
गीता प्रेसकडून १४ भाषांमध्ये एकूण ४१ कोटी ७० लाख पुस्तके प्रकाशित !

गोवा : कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख

‘औ’ या अक्षराची ओळख ‘औरंगजेब’ अशी होणे, हे औरंगजेबाचा खरा क्रूरतेने भरलेला इतिहास न शिकवल्याचा परिणाम !

उलवे (नवी मुंबई) येथे हिंदूबहुल भागात मशिदीसाठी भूखंड देण्याच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाचा मोर्चा !

सिडकोने उलवे येथे हिंदूबहुल भागात मशीद बांधण्यासाठी भूखंड देण्याचे विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. त्याच्या निषेधार्थ उलवे येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यात भाजप, मनसे, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक संस्था यांचे कार्यकर्ते उपस्थित होते

तमिळनाडूमध्ये भाजपच्या राज्य सचिवांना अटक

सूर्या यांनी इतकीच चूक होती की, त्यांनी साम्यवादी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम् यांच्या सहकार्‍यांचा द्वेष आणि दुटप्पीपणा उघड केला होता. अटकेमुळे आम्ही थांबणार नाही. आम्ही सत्य सर्वांच्या समोर आणतच रहाणार.