मशिदीला भूखंड न देण्याची निवेदनाद्वारे मागणी
नवी मुंबई – सिडकोने उलवे येथे हिंदूबहुल भागात मशीद बांधण्यासाठी भूखंड देण्याचे विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. त्याच्या निषेधार्थ उलवे येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यात भाजप, मनसे, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक संस्था यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. (धर्मरक्षणासाठी संघटित झालेल्यांचे अभिनंदन ! हिंदूबहुल भागात मशीद बांधलीच जाऊ नये, यासाठी हा लढा चालू ठेवणे आवश्यक आहे. – संपादक) मोर्चा झाल्यावर मोर्च्याच्या शिष्टमंडळाने सिडको कार्यालयातील अधिकारी प्रशांत भांगरे यांना याविषयी निवेदन दिले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,…
१. सिडकोने सेक्टर १९ मध्ये मशिदीसाठी विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. हा हिंदूबहुल भाग असतांना येथे मशिदीला भूखंड देणे योग्य नाही. त्याला सकल हिंदु समाजाचा विरोध आहे.
२. या संदर्भात उलवे क्षेत्रातील नागरिकांनीही विरोध दर्शवणारे हरकतीचे पत्र दिले आहे. या प्रकरणी ७५० हून अधिक पत्रे देऊनही सिडको प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही; म्हणून हा मोर्चा काढावा लागला.
३. येथे १२ गावे असून यामध्ये २३ सहस्र प्रकल्पग्रस्त आहेत. यामध्ये ९९ टक्के हिंदू आहेत. त्यांची शेकडो वर्षांपूर्वीची मंदिरे, तसेच रहाती घरे यांचा सर्व्हे न करताच केलेल्या भूमी संपादनामुळे अनधिकृत ठरली आहेत. याची नोंद घेण्यासाठी बहुसंख्य हिंदू अनेक वर्षे मोर्चे काढत आहेत; परंतु आपण त्यांच्या भावनांचा विचार न करता १ टक्का समाज असलेल्या मुसलमान लोकांना ज्यांची कधी मशीद या भागात नव्हती, त्यांना ३०० चौरस मीटरचा भूखंड देऊन बहुसंख्य हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे.
४. संपूर्ण भारतातील मशिदींच्या परिसरातील परिस्थिती पहाता उलवे क्षेत्रात मशीद झाल्यावर काय अवस्था होईल, याविषयी गुप्तचर विभागाकडे सखोल चौकशी करून अहवाल मागून घ्यावा. त्यानंतर नागरिकांच्या विरोधामागील कारण लक्षात येईल.
५. सिडकोने या ठिकाणी मशिदीला भूखंड देऊ नये, अशी आमची मागणी आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल भागातही हिंदूंच्या त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढावा लागणे दुर्दैवी ! यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! |