केवळ ४० किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती
पुणे – पावसाळा तोंडावर आला असतांनाही निविदा प्रक्रियेवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपातून अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली आहेत. शहरातील १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी केवळ ४० किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागणार आहे.
उर्वरित ६० किलोमीटर रस्त्यांपैकी ४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी नुकताच कार्यादेश काढण्यात आला आहे. ते काम या जूनच्या अखेरीस पूर्ण होईल, असे पालिकेचे म्हणणेआहे. गेल्या वर्षी समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत वाहिन्या, मलनिस्सारण विभाग आणि विद्युत् विभाग यांनी रस्त्यांची खुदाई केली होती, तसेच ‘एम्.एन्.जी.एल्.’ अन् दूरसंचार आस्थापनांनी सेवा वाहिनी टाकण्यासाठी खुदाई केली होती; परंतु हे काम झाल्यानंतर रस्त्यात केलेले खोदकाम व्यवस्थित भरून न घेतल्याने शहरातील रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे निर्माण झाले होते. त्यातून प्रशासनावर नागरिकांनी तीव्र खेद व्यक्त केला होता.
संपादकीय भूमिका :आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवून जनतेचे हाल करणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? वेळेत दुरुस्ती न करणार्या अधिकार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |