नक्षलवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांची देशविरोधी युती ! – अधिवक्ता (सौ.) रचना नायडू, छत्तीसगड

अधविक्त्या (सौ.) रचना नायडू

रामनाथ देवस्थान – छत्तीसगडमधील वनवासी हे हिंदूच आहेत. त्यांच्यावर ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि नक्षलवादी यांच्याकडून प्रचंड अत्याचार होत आहेत; परंतु त्या सर्व घटनांना प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्धी दिली जात नाही. आज वनवासी हिंदू त्यांची लढाई एकटे लढत आहेत. त्यामुळे त्यांना देशव्यापी समर्थन मिळणे आवश्यक आहे, असे वक्तव्य छत्तीसगड येथील अधविक्त्या (सौ.) रचना नायडू यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी केले.

नक्षलवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांची युती आहे. जेथे विपुल खनिज संपत्ती आणि वनवासी आहेत, त्याच ठिकाणी ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि नक्षलवादी यांनी बस्तान बसवले आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक कारस्थान करून हिंदु वनवासींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. छत्तीसगडमध्ये आशिया खंडातील सर्वांत मोठे चर्च आहे. ते वनवासींना प्रलोभने देऊन त्यांचे सर्वस्व बळकावत आहेत. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली, तरी त्यांनी बळकावलेली संपत्ती आपण परत मिळवू शकत नाही, एवढी त्यांची यंत्रणा मोठी आहे.

नक्षलवाद्यांनी प्रतिदिन स्फोट घडवून छत्तीसगडमधील बस्तरची भूमी रक्तरंजित केली आहे. नक्षलवाद्यांकडून वनवासी मुलांच्या हातांमध्ये बलपूर्वक बंदुका दिल्या जात आहेत. नक्षलवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास नकार देणार्‍यांची क्रूरपणे हत्या करण्यात येते. आज नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ मोठमोठे अधिवक्ते उभे रहातात, लेखकांकडून पुस्तके लिहिली जातात आणि पत्रकारांकडून वृत्ते दिली जातात. नक्षलवाद्यांचे जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी साटेलोटे आहे, तसेच किसान आंदोलन, शाहीन बाग अशा सर्व राष्ट्रविरोधी कारवायांनी पाठिंबा दिला आहे. वनवासींच्या अत्याचारांकडे मानवाधिकार संघटना आणि सरकार या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे, असेही अधिवक्त्या (सौ.) नायडू म्हणाल्या.