श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचे धुवायचे कपडे नीट घडी घालून व्यवस्थित ठेवल्यामुळे त्यातून चांगली स्पंदने जाणवणे आणि त्यांच्या खोलीत दैवी सुगंध येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘‘आपली प्रत्येक कृती परिपूर्ण, म्हणजे ‘सत्यम् शिवम् सुंदरम् ।’ असायला हवी.’’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कपडे ठेवण्याच्या कृतीतून याची मला प्रचीती आली.

श्रीसत्‌शक्तींची तळमळ आणि प्रीती, करील गुरुदेवांची विश्वकल्याणाची स्वप्नपूर्ती ।

‘हे श्रीसत्‌शक्ति, हे माते, आम्हा सर्व साधकांचे तुला साष्टांग नमन असो. अखंड गुरुसेवा करण्यासाठी आम्हाला बळ आणि चैतन्य दे. आम्हाला सतत गुरुचरणांचा ध्यास लागू दे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची एक संत यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

गुरुतत्त्वाचे कणरूपी वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत असणे

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरील लेखात असलेले श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे छायाचित्र सजीव भासण्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

मी त्यांना आपोआपच आत्मनिवेदन केले. तेव्हा ‘त्या माझ्याकडेच पहात आहेत’, असे मला वाटले. मी त्यांना आत्मनिवेदन करत एक प्रयोग केला. मी त्या छायाचित्राकडे डोळे फिरवून डाव्या, उजव्या आणि समोरील दिशेने पाहिले.

मुंबई-पुणे यांच्यातील ‘मिसिंग लिंक’ मार्गाचे काम अंतिम टप्प्यात !

मुंबई – पुणे प्रवासातील अंतर न्यून करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ मार्ग उभारण्यात येत आहे. यासाठी दोन डोंगरांमध्ये देशातील सर्र्वांत उंच केबल पूल निर्माण  केला जात आहे.

शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त होणार !

पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये प्रवाशांच्या साहाय्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त केल्या जाणार आहेत.

मालेगाव येथे सकल हिंदु समाजाकडून निवेदन !

तिरंगा रॅलीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर येथील विविध फलक, तसेच रस्त्यावरील कि.मी. दर्शवणारे मैलाचे दगड यांना काळे फासण्यात आले होते.

पनवेल, उरण मतदारसंघांत ८५ सहस्र १२९ मतदारांची दुबार नावे !

भारतीय शेतकरी कामगार पक्षाने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघांच्या मतदारसंख्येतील ८५ सहस्र १२९ मतदारांची दुबार नावे तातडीने रहित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कोल्हापूर येथील तावडे हॉटेल परिसरातील वाहतूक कोंडी सोडवा !

तावडे हॉटेल चौकामध्ये शहर विभागातील वाहतूक पोलीस नसल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडी इतकी असते की, सरळ मुख्य राज्य महामार्गावर, तसेच शहर विभागातील मुख्य कमान या दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागतात.