श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची एक संत यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये


सूक्ष्म दृष्टीने अभ्यास करायला शिकणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

पू, (सौ.) सखदेवआजी यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या देहाचे निरीक्षण कसे करावे ?, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून शिकतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सुश्री (कु.) राजश्री सखदेव


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातही आता सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता निर्माण झाली असून साधक त्याची प्रचीती घेत आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

टीप : सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारण : सनातनचे काही सद्गुरु, संत आणि साधक सूक्ष्मातील ज्ञान मिळवतात. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. साधक, संत आणि सद्गुरु या क्रमानुसार त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे साधक, संत आणि सद्गुरु यांनी शोधून काढलेल्या एखाद्या सूक्ष्मातील स्पंदनांच्या टक्केवारीत भेद असू शकतो.

१ अ. गुरुतत्त्व

१ अ १. गुरुतत्त्वाचे कण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे प्रवाहित होत असणे : याचे कारण असे की, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आशीर्वाद मिळाला असून साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी मार्गदर्शन करून साहाय्य करण्यासाठी त्यांना ज्ञान मिळते.

१ अ २. गुरुतत्त्वाचे कणरूपी वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सहस्रारचक्राच्या स्थानी कायमस्वरूपी कार्यरत असणे : ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ध्येय असून हे ध्येय साध्य होण्यासाठी त्यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे असे आहे.

१ अ ३. गुरुतत्त्वाचे कणरूपी वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत असणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असल्याने असे आहे.

१ आ. (प्रसंगानुरूप आवश्यक तारक अथवा मारक) देवीतत्त्व

१ आ १. देवीतत्त्व श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहाभोवती असणे : याचे कारण असे की, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या देवीचे रूप असून प्रसंगानुरूप त्यांच्यात मारक अथवा तारक देवीतत्त्व कार्यरत होते, उदा. जेव्हा ‘एखाद्या साधकाचा अहं न्यून व्हायला हवा’, असे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांना वाटते, तेव्हा त्या साधकाशी बोलतांना त्यांच्यात मारक तत्त्व कार्यरत होते. जेव्हा एखाद्या साधकाचे साधनेचे प्रयत्न चांगले होत असून त्याला प्रोत्साहन द्यायचे असते, तेव्हा त्या साधकाशी बोलतांना त्यांच्यात तारक तत्त्व कार्यरत होते.

१ इ. समष्टी भाव

१ इ १. समष्टी भावाचे वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत असणे : ‘समष्टी भाव’ हा त्यांचा स्थायीभाव असल्याने असे आहे.

१ इ २. समष्टी भावाचे कण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून साधकांकडे प्रक्षेपित होत असणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यात प्रीती (निरपेक्ष प्रेम) असल्याने तसे होते. त्यांच्यातील समष्टी भावामुळे त्या साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेत नेहमी साहाय्य करतात.

१ ई. प्रीती : प्रीतीचे वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत असणे

१ उ. चैतन्य

१ उ १. चैतन्याचे वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याभोवती कार्यरत असणे

१ उ २. चैतन्याचे वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून व्यापक स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होत असणे : त्या जिथे जिथे जातात, तिथे तिथे त्यांच्यातील चैतन्य वातावरणात प्रक्षेपित होते.

१ ऊ. आनंद

१ ऊ १. आनंदाचे वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चेहर्‍याभोवती प्रकाशमान स्वरूपात कार्यरत असणे

१ ऊ २. आनंदाचे वलय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून व्यापक स्वरूपात प्रक्षेपित होत असणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची उच्च आध्यात्मिक पातळी असल्याने असे आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची जाणवलेली अन्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात अनेक चांगले गुण असून त्यांच्यात साधनेतील प्रत्येक टप्प्याला चांगली व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची क्षमता आहे. त्यामुळे साधकांनाही त्या व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी योग्य मार्गदर्शन करू शकतात.

आ. त्यांच्यात साधना करण्याची तीव्र तळमळ आहे. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्यांना अपेक्षित अशी साधना करतात.

इ. ‘सर्वकाही परात्पर गुरु डॉक्टरच करून घेतात’, असा त्यांचा भाव आहे. त्यांच्यातील या भावामुळे त्या अखंड आनंदावस्थेत असतात.

ई. आश्रमात घडलेली प्रत्येक चूक त्यांच्या लक्षात रहाते आणि ती चूक पुन्हा होऊ नये, यासाठी त्या प्रयत्नरत असतात.

उ. जेव्हा साधक साधनेशी संबंधित काही समस्या घेऊन श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे जातात, तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने या सर्व अडचणी सुटणार आहेत’, असा विचार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनात येतो आणि याच विचाराने त्या सर्व अडचणी किंवा समस्या सोडवतात.

ऊ. त्या श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असतात. साधकांना साधनेत येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी साधकांना त्यांच्याकडून सहज उत्तरे मिळतात.

ए. त्यांच्यात क्षात्रतेज आणि साक्षीभाव असून त्या नेहमी स्थिर असतात.

ऐ. त्यांच्यात साधकांविषयी इतकी प्रीती आहे की, साधकांकडून साधनेचे चांगले प्रयत्न झाल्यास अथवा साधकांनी एखाद्या सेवेविषयी चांगला अभ्यास मांडल्यास त्यांना पुष्कळ आनंद होतो.

ओ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ स्मित करतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत प्रीती जाणवते, तसेच त्यांचे स्मित पाहून साधकांनाही आनंद मिळतो.

औ. त्यांच्यात शिकण्याची वृत्ती चांगली असून त्यांच्यातील भाव आणि तळमळ यांमुळे त्यांनी स्वतःमध्ये जलद गतीने पालट घडवला आहे.

अं. त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

क. जेव्हा साधक त्यांच्याशी बोलायला येतात, तेव्हा त्या शरणागतभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवतात, त्या वेळी त्या स्वतःला पूर्णपणे विसरून जातात आणि साधकाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतात. तेव्हा त्या एखाद्या आईप्रमाणे साधकाशी बोलतात आणि साधकाला मार्गदर्शन करतात.

ख. साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांचे अंतःकरण प्रीतीमय झालेले असते, तसेच साधकांना त्या सोप्या भाषेत मार्गदर्शन करतात.’

– एक संत (२१.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.