दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला जामीन; अंगणवाडी सेविकांचे आंदोलन परत चालू…

लॉरेन्स बिश्णोई याच्याशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजस्थानस्थित युट्यूबरला अतिरिक्त महानगरदंडाधिकार्‍यांनी १५ जुलै या दिवशी जामीन संमत केला.

वरळी अपघातप्रकरणी मिहीर शहा याच्या कोठडीत ३० जुलैपर्यंत वाढ !

वरळी येथील अपघातप्रकरणी प्रमुख आरोपी मिहीर शहा याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ३० जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १६ जुलैपर्यंतच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

पुणे येथे ३ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक सेवेतून बडतर्फ !

पोलिसांनी लाच मागणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय !

अनंत अंबानी यांच्या विवाहात बाँब ठेवल्याची पोस्ट करणार्‍याला वडोदरा (गुजरात) येथून अटक !

आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या विवाहात बाँब ठेवल्याचा उल्लेख करणारी पोस्ट सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्यात आली होती.

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्याचा आदेश !

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आला. ‘लाल बहादूर प्रशासकीय अकादमी’ यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यशासनाने ही कारवाई केली.

२००६ च्या मुंबई लोकलगाड्यांतील बाँबस्फोट प्रकरणाची सुनावणी चालू

विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच नव्हे का ?

अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्‍या शासनकर्त्यांमुळे देशाचे वाटोळे झाले !

‘अध्यात्म सोडून एक तरी विषय ‘सात्त्विक, सज्जन, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी कसे व्हायचे’, हे शिकवतो का ? तसे नसतांना अध्यात्म सोडून अन्य सर्व विषय शिकवणार्‍या स्वातंत्र्यापासूनच्या ७५ वर्षांतील भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी देशाचे वाटोळे केले आहे.