
मुंबई – आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या विवाहात बाँब ठेवल्याचा उल्लेख करणारी पोस्ट सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या ‘एक्स’ हँडलरचा शोध घेत गुजरात राज्यातील वडोदरा येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. विरल शाह असे त्याचे नाव आहे. या पोस्टमध्ये विरल याने लिहिले होते, ‘माझ्या मनात येत आहे की, अनंत अंबानी याच्या विवाहात बाँबस्फोट झाला, तर अर्धे जग उलटून जाईल.’
या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. अनंत आणि राधिका यांचा विवाहसोहळा १२ जुलै या दिवशी मुंबई येथील ‘जिओ सेंटर’मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. देशासह विदेशातील दिग्गज लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था पुरवली होती, तसेच मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अंबानी यांचा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !