गुरुभक्ती आणि हरिभक्ती जागृत करणार्या अन् अनेक जिवांच्या उद्धारक असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पादुका !
‘परात्पर गुरु डॉक्टर, मी आज सेवाकेंद्रात आलो आणि तुमच्या पादुकांचे दर्शन मला लाभले. तुमच्या या पादुकांकडे पहाता मला तुमचीच आठवण येते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.