हें मजचिस्तव जाहलें । परि म्यां नाहीं केलें ।।
सूर्य उगवण्यामुळे फुले उमलतात; पण सूर्य असे म्हणत नाही, ‘हे मी केले’ ! परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेरूपी धर्मसूर्याच्या संदर्भातही असेच आहे ! विविध नाडीपट्ट्यांच्या माध्यमातून महर्षींनी आणि अनेक संतांनीही सांगितले आहे, ‘पृथ्वीवर धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठीच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्म झाला असून त्यांच्यामुळेच ते कार्य होणार आहे.’ त्यांचे स्थुलातील कार्य केवळ ३० टक्केच, तर सूक्ष्मातील कार्य ७० टक्के एवढे आहे. परात्पर गुरु डॉक्टरांसारख्या अत्युच्च कोटीतील संतांचा अव्यक्त संकल्प आणि अस्तित्व यांमुळे आपोआपच सारे कार्य होत असते, हे शतशः सत्य आहे. सनातनचे संत आणि साधक यांनाही पदोपदी याची प्रचीती येत असल्यामुळे ‘परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याकडून राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी संतसंघटन करवून घेत आहेत’, असाच त्यांचा भाव आहे. परात्पर गुरु डॉक्टररूपी धर्मसूर्याला सेवारूपी अर्घ्य देण्याची संधीही तेच देत आहेत; म्हणून सर्व साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहेत !