महर्षींनी गौरवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘अवतारत्व’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरवलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !

‘२४ जुलै २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या (भाग २)मध्ये आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘परात्पर गुरु’पदापर्यंतचा दैवी साधनाप्रवास पाहिला. आता या लेखाच्या शेवटच्या भागात (भाग ३ मध्ये) महर्षींनी गौरवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘अवतारत्व’ यासंदर्भातील संशोधन पाहूया.

व्यक्तीची स्पंदने तिच्या छायाचित्रातही विद्यमान असतात. या तत्त्वानुसार परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रांत त्यांची त्या त्या काळातील स्पंदने विद्यमान आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वर्ष २०१४ ते २०२४ या कालावधीतील (वय ७२ वर्षे ते आतापर्यंत (वय ८२ वर्षे पर्यंत)) काही निवडक छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे चाचण्या करण्यात आल्या. ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येतात. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/816923.html

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांच्या लोलकाने मोजलेल्या नोंदी (वर्ष २०१४ ते २०२४)

टीप १ – या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे मोजतांना ती २३०० मीटरपेक्षाही अधिक होती; पण चाचणीस्थळी यापेक्षा अधिक जागा उपलब्ध नसल्याने ती पूर्ण मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.

टीप २ – या छायाचित्रांत नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

३ अ. वर्ष २०१४ पासून परात्पर गुरु डॉक्टरांमधील विष्णुतत्त्व जागृत होऊन कार्यरत होण्यास आरंभ होणे : वर्ष २०१३ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जा १ सहस्र २५७ किलोमीटर होती. वर्ष २०१४ मध्ये म्हणजे अवघ्या १ वर्षात ती २१ सहस्र ३४० किलोमीटर झाली. याचे कारण हे की, परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व आहे. वर्ष २०१४ पासून त्यांच्यातील विष्णुतत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. त्यामुळे त्यांच्याकडून आधीच्या तुलेनत पुष्कळ अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होऊ लागले.

सौ. मधुरा कर्वे

३ आ. वर्ष २०१५ पासून सप्तर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून सनातनला मार्गदर्शन करण्यास आरंभ करणे : वर्ष २०१५ मध्ये सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असल्याचे सांगितले. वर्ष २०१५ मध्ये महर्षींनी प्रथमच परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव साजरा करण्यास साधकांना सांगितले. तेव्हापासून आजपावतो महर्षींच्या आज्ञेने आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिवर्षी परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. वर्ष २०१८ पासून महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉक्टरांनी जन्मोत्सवांत श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीविष्णु, दत्तात्रेय आदी देवतांच्या रूपांत (देवतांची वेशभूषा धारण करून) साधकांना दर्शन दिले. वर्ष २०२० पासून परात्पर गुरु डॉक्टरांमधील सकारात्मक ऊर्जा १ लक्ष किलोमीटरपेक्षाही अधिक आहे. हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

३ इ. सप्तर्षींच्या आज्ञेने वर्ष २०२२ आणि २०२३ मधील जन्मोत्सवात परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘न भूतो न भविष्यती ।’, असे दिव्य सोहळे साजरे करण्यात येणे : वर्ष २०२२ मध्ये सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही अध्यात्मातील सर्वाेच्च उपाधी दिली. वर्ष २०२२ मधील ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा दिव्य रथोत्सव’ आणि वर्ष २०२३ मधील ‘न भूतो न भविष्यती ।’ असा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा ब्रह्मोत्सव’ म्हणजे साधकांसाठी जीवन कृतार्थ करणारे दिव्य सोहळे ठरले. वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांमधील सकारात्मक ऊर्जा २ लक्ष किलोमीटरपेक्षाही अधिक आहे.

थोडक्यात वर्ष २०१४ ते वर्ष २०२४ या ११ वर्षांच्या कालावधीत परात्पर गुरु डॉक्टरांमधील विष्णुतत्त्व जागृत होऊन ते अधिकाधिक कार्यरत झाले. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण उत्तरोत्तर विलक्षण वाढत गेल्याचे चाचण्यांतील नोंदींतून दिसून आले. यातून ‘सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘श्रीविष्णूचा अंशावतार’ असे का संबोधले आहे’, हे लक्षात येते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेने त्यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरवलेले त्यांचे ‘अवतारत्व’ या संशोधनातून उलगडण्याची अपूर्व संधी आम्हा साधकांना मिळाली, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.७.२०२४)


लोलक-परीक्षणाद्वारे घटकाची अचूक प्रभावळ मोजण्याची पद्धत


वर्ष २०२१-२०२२ मध्ये ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करतांना काही घटकांच्या प्रभावळी २ सहस्र ३०० मीटरपेक्षाही अधिक होत्या; पण जागा अपुरी पडत असल्याने त्या अचूक मोजता येत नव्हत्या. या प्रभावळी अचूक मोजण्यात येणार्‍या मर्यादा लक्षात घेऊन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने लोलक-परीक्षणाद्वारे म्हणजे लोलकाचा उपयोग करून त्या अचूक मोजण्यास आरंभ केले.

‘लोलकाने घटकाची अचूक प्रभावळ कशी मोजली जाते ?’, याविषयी सर्वांना कुतूहल असते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे साधक लोलक-परीक्षण कसे करतात ? याची माहिती पुढे दिली आहे.


१.
लोलक-परीक्षण करणारा साधक सर्वप्रथम इष्टदेवतेला ‘माझ्याभोवती आणि लोलकाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊ दे’ अशी प्रार्थना करतो. त्यानंतर तो पुढील प्रश्न विचारतो.

प्रश्न १. मी लोलक-परीक्षण करू शकतो का?

प्रश्न २. लोलक-परीक्षण करण्यासाठी निवडलेले स्थळ आणि वेळ योग्य आहे का ?

लोलकाने दोन्ही प्रश्नांना होकार दर्शवल्यावर साधक लोलक-परीक्षण करण्यास आरंभ करतो.

२. लोलक-परीक्षण करण्यासाठी ज्याचे परीक्षण करायचे तो घटक किंवा त्याचे छायाचित्र आणि काही तक्ते यांची आवश्यकता असते. साधक घटकाची प्रभावळ मोजण्यासाठी त्यासमोर लोलक धरून काही प्रश्न विचारतो. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विविध प्रकारचे तक्ते उपयोग आणले जातात, उदा. ‘हो’ आणि ‘नाही’ यांचा तक्ता; ‘मीटर’ आणि ‘किलोमीटर’ यांचा तक्ता; आकड्यांचे तक्ते, उदा. १ ते १० आकड्यांचा तक्ता; ५,१०,५०,१०० इत्यादी संख्यांच्या पटीतील आकड्यांचे तक्ते; १ सहस्र ते १० सहस्र, १० सहस्र ते १ लक्ष, १ लक्ष ते १० लक्ष, १० लक्ष ते १०० लक्ष इत्यादी पटीतील आकड्यांचे तक्ते. यांपैकी आवश्यक त्या तक्त्यांचा उपयोग करून आणि आवश्यक ते प्रश्न विचारून साधक त्या घटकाची अचूक प्रभावळ मोजतो आणि ती नोंद करून ठेवतो.

३. लोलक-परीक्षण करून झाल्यावर साधक इष्टदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.७.२०२४)

वैज्ञानिक, संशोधक, वाचक आणि हितचिंतक यांना नम्र विनंती !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेल्या आध्यात्मिक संशोधनासाठी उपयुक्त ठरतील अशा काही नवीन वैज्ञानिक उपकरणांची माहिती आपणाला असल्यास पुढील ई-मेल पत्त्यावर संपर्क करून अवश्य कळवावे.

ई-मेल : [email protected]

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.