श्री क्षेत्र भीमाशंकर (पुणे) श्रावणी यात्रेसाठी प्रशासनाने सिद्ध रहावे ! – प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांचे आदेश

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण यात्रेच्या काळात वाहनतळ आणि देवदर्शनाला येणार्‍या भाविकांची लूट थांबवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी प्रयत्न करावेत. एस्.टी. महामंडळाने ‘मिनी बस’ची (लहान गाडी) संख्या वाढवून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, असे आदेश प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले.

‘पी.एम्. किसान सन्मान’ योजनेत राज्यात २० लाख ५० सहस्र लाभार्थींची वाढ ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

‘केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘पी.एम्. किसान सन्मान’ योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रतिवर्षी ६ सहस्र रुपये, तर यावर्षीपासून राज्यशासनाने चालू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेतून ६ सहस्र रुपये, असे एकूण १२ सहस्र रुपये शेतकर्‍यांना दिले जातात.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला खासदारकीची शपथ घेण्यासाठी पॅरोल संमत !

अमृतपाल सिंह हा पंजाबमधील खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडून आला आहे. त्याला लोकसभेत शपथ घेण्यासाठी पॅरोल संमत करण्यात आला आहे.

४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश विनामूल्य मिळणार  ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

महाराष्ट्र राज्यातील ४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना विनामूल्य शालेय गणवेश योजनेचा लाभ होणार आहे. येत्या ३० जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोचतील.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा प्रयत्न ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क मंत्री

याविषयी सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कपिल पाटील, अमोल मिटकरी, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापतींना दिले दिलगिरीचे पत्र !

विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी २ जुलै या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर ५ दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पद भरतीसाठी शासन सकारात्मक ! – मंत्री उदय सामंत

याविषयी लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत ३ जुलै या दिवशी प्रश्नोत्तरात दिली.

पुणे महानगरपालिकेकडून ‘निर्मल वारी’ स्वच्छता मोहीम !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २ दिवस मुक्काम करून पंढरपूरकडे रवाना झाल्या.

पुणे येथील अमली पदार्थ प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची सरकार पक्षाची मागणी !

त्यांचे अन्य कुणी साथीदार त्यांना अमली पदार्थ पुरवण्यास साहाय्य करतात, याविषयीचे अन्वेषण करायचे असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षासह अन्वेषण अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयाला केली.

शेतकर्‍यांचा पीकविम्याचा अर्ज भरतांना ई-सेवाकेंद्रांकडून अधिक रुपयांची मागणी !

असे प्रकार घडतातच कसे ? प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !