कोल्हापूर येथील उद्योजक महेश उत्तुरे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान !

उद्योजक महेश उत्तुरे (मध्यभागी) यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करतांना आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, तसेच अन्य

कोल्हापूर – उद्योजक महेश उत्तुरे यांना गोवा सरकारच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. गोवा येथे झालेल्या सोहळ्यात ‘इन्फोटेक’ महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते उत्तुरे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख उपस्थित होते. ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आजच्या शासनकर्त्यांनी आचरण करावे’, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या वेळी केले.

यंदा गोव्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमोद आचार्य, चकोते उद्योग समुहाचे अण्णासाहेब चकोते यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.