वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
मुंबई – फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५ जुलै या दिवशी विधानसभेत केली. ही समिती कांदळवनांच्या भूमीवरील अतिक्रमण शोधेल, असेही त्यांनी नमूद केले. नवी मुंबईतील नेरूळमधील तलावाजवळ काही फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याचे सूत्र आमदार चेतन तुपे यांनी उपस्थित केले होते. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘तलावाजवळ ६ मृत, तर सहा फ्लेमिंगो घायाळ स्थितीत आढळले होते. त्यापैकी ४ घायाळ फ्लेमिंगोंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.’’